आर्थिकजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रयोजनाशासकीयसामाजिक

पोलिस अधीक्षक कार्यालयात 100 किलोवॉट क्षमतेचे सोलर प्लांट कार्यान्वित !

पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची संकल्पना; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) : पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे 100 किलोवॉट क्षमतेचे सोलर प्लांट कार्यान्वित झाले आहे. या प्लांटचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्लांटमुळे पोलिस अधीक्षक कार्यालयातील वीज बिल खर्च कमी होणार असून, अधिकची वीज तयार होणार आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक कार्यालय, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधीक्षक जळगाव भाग जळगाव यांचे कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय, जिल्हा विशेष शाखा अशा विविध शाखा असून सर्व शाखा या संगणीकृत करण्यात आलेले आहेत. तसेच या शाखेमध्ये सुमारे महिन्याकाठी 10000 ते 11000 युनिट्स वीज खर्च होत असते. आता नव्याने पोलीस अधीक्षक कार्यालयातील छतावर 4000 ते 5000 स्क्वेअर फूट जागेमध्ये Sunstroat Green technology Pvt Ltd या कंपनीचे 184 सोलर प्लेट बसवलेल्या असून, सोलर प्लांट मुळे दिवसाला कमीत कमी 300 युनिट्स वीज व उन्हाळ्यात 400 ते 450 युनिट तयार होणार आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयातील वीज बिल खर्च कमी होणार असून, अधिकची वीज तयार होणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उप अधीक्षक(गृह)श्री. आव्हाड, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षकसतीश गोराडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार आदी अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button