जळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रराजकारणशासकीय

जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला!

१५ जानेवारीला मतदान, १६ रोजी निकाल, आचारसंहिता लागू

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये जळगाव महानगरपालिकेचाही समावेश असून, त्यामुळे शहरात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक जाहीर होताच आजपासून जळगाव महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २३ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी, २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत, तर ३ जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

जळगाव महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. जळगाव महापालिकेअंतर्गत एकूण १९ प्रभाग असून ७५ नगरसेवकांची निवड या निवडणुकीतून होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीला वेग दिला असून, प्रशासनही सज्ज झाले आहे. शहरात राजकीय हालचालींना जोर आला असून, पुढील काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button