आरोग्यअभिवादनजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

रोटरीतर्फे आयोजित महारक्तदान शिबिरात ३५० रक्तपिशव्यांचे संकलन

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सर्व दहा रोटरी क्लबच्या वतीने ८ डिसेंबर रोजी विविध १२ ठिकाणी झालेल्या महारक्तदान शिबिरात ३५० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. नाशिक ते नागपूर असे कार्यक्षेत्र असलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील ११६ रोटरी क्लबतर्फे मिशन लाईफ प्रोजेक्ट अंतर्गत एकाच दिवशी या रक्तदान शिबिरांचे आयोजन प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.

शहरातील रोटरी क्लब जळगावतर्फे टेकफ्लो इंजिनीयर प्रा. लि. येथे ३३ तर रोटरी जळगाव मिडटाउनतर्फे मासटेक कंट्रोल कंपनीत २० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. रोटरी जळगाव वेस्ट तर्फे एम.जे.कॉलेज आणि बाहेती कॉलेज येथे आयोजित शिबिरात ४० विद्यार्थी व प्राध्यापकांनी रक्तदान केले. यासाठी रोटरक्ट जळगाव वेस्टचे सहकार्य लाभले. रोटरी जळगाव ईस्टतर्फे व्हिजन इंडस्ट्रीज येथे झालेल्या शिबिरात ३० रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि सरदार वल्लभ भाई पटेल सभागृह येथे ३७ व्यक्तीने रक्तदान केले. रोटरी जळगाव इलाईट तर्फे एमआयडीसीतील सुप्रीम इंडस्ट्रीज आणि सूनसगाव या ठिकाणी ११० तर रोटरी जळगाव नॉर्थ तर्फे कालिंका माता चौकात झालेल्या शिबिरात ३१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

रोटरी जळगाव रॉयल्स तर्फे सुप्रीम कॉलनीत १४ तर रोटरी जळगाव स्टार्सतर्फे फुले मार्केट येथील शिबिरात ३३ व्यक्तींनी रक्तदान केले. या शिबिरांसाठी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, सिव्हिल हॉस्पिटलचे रक्त विघटन केंद्र यांचे तंत्रज्ञ व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button