आरोग्यआर्थिकक्राईमजळगावताज्या बातम्याशासकीयसमस्या

रावेरच्या रथ यात्रेतून मंगळसूत्र लांबविणारी महिला जेरबंद!

२४ तासांत लावला गुन्ह्याचा छडा; रावेर पोलिसांची कारवाई

रावेर (प्रतिनिधी) : रावेर शहरात श्री दत्त जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या वार्षिक रथ यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन यात्रेत आलेल्या तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या एका सराईत महिलेला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांनी मोबाईलमध्ये काढलेल्या व्हिडिओच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्याचा २४ तासांत छडा लावला आहे. .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागे पल्लवी विशाल पाटील (रा. शिवाजी चौक, रावेर) या रथयात्रेत दर्शनासाठी गेल्या असताना, त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरीला गेले. तपासणीदरम्यान याच परिसरात राजश्री चौधरी आणि रोहिणी भिडे यांच्याही गळ्यातील मंगळसूत्रे चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये ६ डिसेंबर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पथकाने सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु गर्दीमुळे चोरट्या महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. यानंतर पोलिसांनी तांत्रिक कौशल्य वापरत रथ यात्रेत सहभागी नागरिकांनी काढलेल्या मोबाईल शूटिंग व फोटोंचा अभ्यास केला. एका व्हिडिओमध्ये संशयित महिलेचे वर्णन आणि राहणीमान स्पष्ट दिसले.

या आधारावर, पोलिसांनी संपूर्ण यात्रेच्या परिसरात संशयित महिलेचा शोध सुरू केला. लवकरच ही महिला संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आली. तिला ताब्यात घेऊन विश्वासात विचारपूस केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचा मुद्देमाल काढून दिला. आरोपीची ओळख अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव संजना रोहेल शिंदे (वय २०) असून, ती मूळची हसनाबाद (ता. भोकरदन, जि. जालना) येथील असून सध्या भोईसर (जि. ठाणे) येथे राहत असल्याचे समोर आले आहे. पुढील कारवाईसाठी संजना शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मीस देशमुख करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस उपअधिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाने पोलिस स्टेशन रावेर मधील पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, सहायक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख गुन्हे शोध पथकातील, पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.शि. विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भुषण सपकाळे, सुकेश तडवी,, तथागत सपकाळे, संभाजी बिजागरे, मपोशि. पुजा साळी यांनी आरोपीताचा शोध घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button