आरोग्यजळगावताज्या बातम्याधार्मिक

अयोध्येहून परतणाऱ्या भाविकांच्या बसचा अपघात, जळगावातील 1 महिला ठार, 15 जण जखमी

जळगाव (प्रतिनिधी) : अयोध्येहून प्रभू श्रीरामचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे . उत्तर प्रदेशातील अयोध्या-प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. अयोध्या येथून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांच्या बसला वेगाने येत असलेल्या ट्रेलरने धडक दिली. या भीषण अपघातात एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे ४० भाविक प्रवास करीत होते. हे सर्व भाविक जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजत आहे. अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन प्रयागराज येथे दर्शनासाठी मार्गस्थ झाले होते. अचानक एका अनियंत्रित ट्रेलरने बसला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भयानक होती की बस आणि ट्रेलर दोन्ही उलटले. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि प्रवासी तातडीने मदतीसाठी धावले आणि उलटलेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

सुमारे १५ भाविकांना गंभीर जखमी झाले असून जखमींना तात्काळ ॲम्ब्युलन्सच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. तात्काळ डॉक्टरांनी सर्व जखमींच्या उपचाराला सुरुवात केली. मात्र उपचारादरम्यान पिंप्राळा परिसरातील कल्पना शरद पाटील (४५) या महिलेचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी महामार्गावर उलटलेली बस आणि ट्रेलर काढण्यासाठी क्रेन बोलावली आणि बचावकार्य सुरू केले. पोलिस सध्या घटनेची तपासणी करत आहेत प्रशासनाने जखमींना शक्य तितकी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button