आरोग्यअभिवादनजळगावताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

जळगावमध्ये 29 डिसेंबर रोजी नि:शुल्क गर्भमुख कैंसर प्रतिबंधात्मक लस शिबीर

लायंस क्लब जलगाव सेंट्रल व लिनेस क्लब जलगावचा संयुक्त उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : लायंस क्लब जलगाव सेंट्रल व कैंसर पेशेंट ऐड एसोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने मागील 4 वर्षापासून गर्भ मुख कैंसर प्रतिबंधात्मक लस शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. डॉ.निलेश चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली चांडक कैंसर हॉस्पिटल येथे आतापर्यंत या लसीचे 15000 डोसेसचे यशस्वीपने लसीकरण झालेले आहे.

या वर्षी सुद्धा लायंस क्लब जलगांव सेंट्रल व लिनेस क्लब जलगांव सोमवार, दि. 29 डिसेंबर रोजी चांडक कैंसर हॉस्पिटल येथे या निःशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी कैंसर पेशेंट ऐड एसोसिएशन CPAA मुंबईची सामाजिक संस्थेतर्फे लासीची 1000 डोसेस उपलब्ध करण्यात येत असुन 9 ते 20 वर्षापर्यंत चे मुलींना हि लस देण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष ला जगदीश जाखेटे व लीनेस क्लब अध्यक्षा रेशमा बेहरानी यांनी दिली.

येथे करता येईल नोंदणी
या प्रकल्पाचे प्रमुख लायन किशोर बेहराणी, ला दिनेश बोरा हे आहे. शिबिरासाठी विविध शाळांमध्ये जाऊन या लसीचे महत्व व आवश्यकता लायन्स क्लबचे सदस्य व डॉ. श्रद्धा चांडक यांचे व्याख्यानद्वारे समजवुन देत आहे. नाव नोंदणीसाठी १. राका टायर, चित्रा चौक, २. लक्ष्मी ज़ेरॉक्स,मनियार होलसेल गल्लीत, तिरुपति होटल मागे, ३. भंडारी मेडिकल, कांग्रेस भवन समोर, ४. सुराणा मेडिकल, भास्कर मार्केट समोर या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

यशस्वितेशाठी लायंस क्लब सेंट्रलचे अध्यक्ष इंजि.जगदीश जाखेटे, सचिव अल्पेश कोठारी, कोषाध्यक्ष नरेंद्र भैया, प्रकल्प प्रमुख किशोर बेहराणी, दिनेश बोरा, रेशमा बेहरानी सुगन मुनोत, डॉ. निलेश चांडक, डॉ. श्रद्धा चांडक, विनय चांडक, मनीष मंडोरा, जयेश ललवानी,पराग लुंकड, उमेश झवर विनोद भंडारी आदी लायंसचे सदस्य परिश्रम घेत आहे. मुलींनी जास्तीत जास्त संखेने या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन लायंस क्लब जलगांव सेंट्रलचे अध्यक्ष जगदीश जाखेटे व लीनिस क्लबचे अध्यक्षा रेशमा बेहरानी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button