ताज्या बातम्याअभिवादनआरोग्यक्राईमजळगावमहाराष्ट्रसमस्या

जळगावात हायव्होल्टेजच्या धक्क्याने बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, भाची जखमी !

मास्टर कॉलनीत घटना, रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथे आज शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉक लागल्याने बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत 16 वर्षाची भाची गंभीर जखमी झाली असून रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता. मौलाना साबीर खान नवाझ खान (35) आणि त्यांची मोठी मुलगी आलिया (12) असे मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मौलाना साबीर यांची भाची मारिया फतेमाबी ही कपडे टाकण्यासाठी गच्चीवर गेली होती. त्यावेळी कपडे टाकत असताना जवळच असलेल्या उच्च दाबाची हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक तारचा तिला धक्का बसला व तिला वाचवण्यासाठी आलिया ही गेली असता तिला पण जोरदार धक्का बसला मुलगी आणि भाची यांना इलेक्ट्रिक शॉक लागल्याचे पाहून मौलाना शाबीर हे त्यांना वाचण्यासाठी गेले असता त्यांना देखील विजेचा जबरदस्त धक्का बसला. या घटनेत मौलाना साबीर खान (38) व त्यांची मोठी मुलगी आलिया (12) यांचा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत भाची मारिया फतेमाबी ही गंभीर जखमी झाली. तिला नजीकच्या सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

महावितरण’चे दुर्लक्ष
या घटनेत मौलाना साबीर खान यांचा लहान मुलगा मात्र थोडक्यात बचावला. गेल्या काही महिन्यांपासून उच्च दाबाची विद्युत वाहिनी ही घराजवळून गेल्याने या परिसरातून हे विद्युत वाहिनी हटवावी, अशी मागणी करण्यात आली परंतु महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button