
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे जिजामाता माध्यमिक विद्यालय (हरी विठ्ठल नगर) येथे करिअर विषयी चार्टर्ड अकाउंटंट अंशू अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आर.खोरखेडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपले करिअर कसे निवडायचे व कोणत्या परीक्षा देऊन आपण यशस्वी होऊ शकतो याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास रोटरी जळगाव गोल्डसिटी अध्यक्ष डॉ.निरज अग्रवाल, मानद सचिव स्वप्नील पलोड, सी.ए. पंकज अग्रवाल, अशोक जैन,निलेश जैन,एकता अग्रवाल,स्मिता पलोड, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक आणि शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय खैरनार तर आभार प्रदर्शन किशोर पाटील यांनी केले.




