आरोग्यजळगावताज्या बातम्यासामाजिक

जागतिक मधुमेह दिनी बाराशे व्यक्तींची रक्त शर्करा तपासणी

जळगाव (प्रतिनिधी) : येथील इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव शाखा आणि आरोग्यदीप किडनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनानिमित्त १२०० व्यक्तींची मोफत रक्त शर्करा तपासणी करण्यात आली. सकाळी सात ते नऊ या वेळेत भाऊंचे उद्यान, गांधी उद्यान, आंबेडकर उद्यान, बहिणाबाई उद्यान आणि लांडोरखोरी उद्यान अशा पाच ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

इन्शुलीनचे जनक सर फेडरीक बॅटिंग यांच्या स्मरणार्थ जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात येतो मधुमेहासारख्या गंभीर व वाढत्या आरोग्य समस्येबद्दल जनजागृती करण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे आरोग्यदीप किडनी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे यांनी सांगितले. आयएमएचे सचिव डॉ. भरत बोरोले व सर्व सदस्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button