आरोग्यआर्थिकक्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीयसमस्या

बुरहानपुर येथे रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापणारे अट्टल चोरटे जेरबंद!

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथे रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. दोघांना बुऱ्हानपूर कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुरहानपूर कोतवाली पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापून चोरी करण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा जळगाव पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार वसीम कय्युम खाटीक (मास्टर कॉलनी, जळगाव) आणि तौसीफ सत्तार खान (रामनगर, जळगाव) या दोघांनी साथीदारांच्या मदतीने केल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाच्या मदतीने दोघांना जेरबंद केले.

पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हे कॉ अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे, महेश सोमवंशी यांनी या कामागिरीत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button