स्वामी कपडा बँक: तांड्यांवरील गरजूंना मदत, कपड्यांचा नवजीवन!

स्वामी एज्युकेशनल ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पवार यांची प्रेरणा
रावेर (प्रतिनिधी) : दिवाळीच्या आनंदमय शुभपर्वात रावेरच्या स्वामी एज्युकेशनल ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पवार यांच्या प्रेरणेतून राबवलेल्या ‘कपडा बँक’ या अनोख्या उपक्रमाने आदिवासी भागातील लहान-मोठ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. हा उपक्रम केवळ कपड्यांचे वाटप नव्हे, तर सामाजिक समानतेची एक सुंदर ज्योत पेटवणारा प्रयत्न आहे, ज्याने सगळ्यांना दीपोत्सवाची खरी मजा अनुभवता आली.
रवींद्र पवार यांची संकल्पना असलेली ‘कपडा बँक’ ही एक सामाजिक क्रांती आहे. यातून गोळा केलेले कपडे आदिवासी भागातील कुटुंबांना दिले जातात. यावेळी दिवाळीच्या निमित्ताने बहुसंख्य महिला-पुरुष, मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना रंगीत, आरामदायी कपडे, मिळाले. आदिवासी दुर्गम गावांमध्ये पोहोचलेल्या या वाटपाने तेथील बालकांच्या डोळ्यांत आनंदाचे दिवे तेवले. “हे कपडे मिळाल्याने आम्हाला दिवाळी साजरी करण्याचा खरा आनंद मिळाला असे जणू तेथील लोकांच्या डोळ्यात दिसत होता.
१०० हुन अधिक कुटुंबांना लाभ
ताडजीन्सी, विश्रामजीन्सी , आभोडा तांडा अशा सुमारे १०० हुन अधिक कुटुंबांना याचा लाभ झाला असून, हे वाटप केवळ कपडे देणे नव्हे, तर आत्मसन्मान आणि स्वाभिमान वाढवण्याचे माध्यम आहे, जे आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी मोलाचे आहे. “दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. हा प्रकाश केवळ घराघरात नव्हे, तर प्रत्येकाच्या हृदयात पोहोचला पाहिजे. ‘कपडा बँक’द्वारे आम्ही हे स्वप्न साकार करत आहोत.” अशा उपक्रमांमुळे समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य साधले जात आहे.दिवाळीच्या या पर्वात ‘कपडा बँक’ने दिलेला हा आनंद प्रत्येकाच्या जीवनात दीर्घकाळ टिकेल. आपण सर्वजण अशा दानशील उपक्रमांना प्रोत्साहन देऊन सामाजिक सलोखा वाढवूया. शुभ दिवाळी!




