महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्य : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव येथील कर्मचाऱ्यांचा सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव येथे कार्यरत असलेले अध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील सक्रिय सहभागाबद्दल आज दि. ९ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनातर्फे सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांवचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला.
याप्रसंगी, प्रशासकीय कामकाजातील तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध विभागांतील अनेक अध्यापकांनी, अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सन्मानपत्र स्वीकारले. या सन्मानपत्राद्वारे आरोग्य योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीत त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले असून, ते भविष्यातही अशाच प्रकारे शासकीय योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहतील अशी अपेक्षा आहे.
यांचा झाला सन्मान
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, उपअधिष्ठाता (पदव्युत्तर) डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, प्रशासकीय अधिकारी (महाविद्यालय) डॉ. जितेंद्र सुरवाडे, प्रशासकीय अधिकारी (रुग्णालय) संजय चौधरी, उच्च श्रेणी लघुलेखक दिलीप मोराणकर, निम्नश्रेणी लघुलेखक निलेश बारी यांच्यासह प्राध्यापक डॉ. राजश्री चौरपगार, डॉ. पाराजी बाचेवार, डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. विश्वनाथ पुजारी, डॉ. अमित हिवरकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. दिपक शेजवळ, डॉ. हितेश अडचित्रे, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विलास मालकर, डॉ. मोनिका युनाती, डॉ. राजेश जांभुळकर, डॉ. संगीता गावीत, डॉ. रोहन पाटील, सहाय्यक प्राध्यापक डॉ. ललित राणे, डॉ. गिरीश राणे, डॉ. इंद्राणी मिश्रा प्रसाद, डॉ. स्वप्निल चौधरी,डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा चौधरी,डॉ. राहुल कातखडे, डॉ. डॅनिअल साजी, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. सुमित जैन, अधिसेविका संगीता शिंदे, कृष्णा भागवत, राजा कोळेकर, अभिषेक पाटील, संदीप माळी यांचा सन्मान करण्यात आला.




