आरोग्यअभिवादनजळगावताज्या बातम्याधार्मिकपर्यावरणसामाजिक

माजी नगरसेवक नाईक परिवाराने केली मनपा संकलन केंद्राला गणपती मूर्ती दान

जळगाव (प्रतिनिधी) : प्रदूषण हा संपूर्ण जगासमोरील मोठा प्रश्न आहे. यात स्थानिक पातळीवर प्रशासनाने, सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम घ्यावेत आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करावं, असं नेहमीच बोललं जातं. मात्र आता या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी पालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनाप्रसंगी होणारे प्रदूषण हा एक मोठा चर्चेचा विषय आहे. यावर एक उपाय म्हणून पालिकेने आता गणपती ‘विसर्जना ऐवजी दान करा’ या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

जळगाव महानगरपालिकेमार्फत यंदाही गणेशमूर्ती दानाचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गणेश मूर्तींचं विसर्जन तलाव, नदीपात्र न करता गरजूंना गावातील, रस्त्यांवरील इच्छुक भाविकांना पूजनासाठी दान करण्याचा महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे. बाप्पाची मूर्ती विसर्जनाऐवजी दान करा: अनंत चतुर्दशी दिवशी हा उपक्रम राबवण्यात येतो. ज्या गणेश भक्तांना बाप्पाची मूर्ती विसर्जनाऐवजी दान करण्याची इच्छा असेल त्यांनी या संकलन केंद्राशी संपर्क करण्याचं आवाहन जळगाव महानगर पालिकेने केले होते.

यावर्षी प्रदूषण हा संपूर्ण जगासमोरील मोठ्या प्रश्नाला मदत म्हणून आम्ही आमच्या घरातील गणपतीची मूर्ती महापालिकेला दान करत आहोत. अशी माहिती मा. नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांनी यांनी दिली. प्रभागातील सर्व नागरिकांनी मनपाच्या या अभिनव उपक्रमाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button