क्राईमजळगावताज्या बातम्याशासकीय

मेहुणबारे पोलिसांची मोठी कारवाई; मोटार सायकल चोरट्यास अटक, दोन दुचाकी हस्तगत

जळगाव (प्रतिनिधी) : मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दरेगाव आणि वरखेड येथून चोरीला गेलेल्या मोटार सायकलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी दरेगाव आणि वरखेड परिसरातून दिवसा दोन मोटार सायकली चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गु.र.क्र. ०७/२०२६, बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास आणि अटक
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींची ओळख पटवली. त्यापैकी दादू संजय सोनवणे (वय १९, रा. दरेगाव, ता. मालेगाव) याला मालेगाव येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेली एक आणि इतर एक अशा एकूण दोन मोटार सायकली जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी सराईत चोरटा असून, त्याचे इतर दोन साथीदार सध्या फरार आहेत. त्यांच्या अटकेनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

यांनी केली कामगिरी
ही कारवाई प्रभारी अधिकारी सपोनि प्रवीण दातरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, विकास शिरोळे, पोलीस कर्मचारी मोहन सोनवणे, गोकूळ सोनवणे, मिलिंद कुमावत, विनोद बेलदार, राकेश काळे आणि प्रशांत खैरे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button