जळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रशासकीयसमस्या

जळगाव मनपा निवडणूक : जळगाव जिल्हा पोलीस दल सज्ज!

२५१ शस्त्र जप्त; एकूण १६९ मतदान केंद्रावर होणार मतदान

जळगाव (प्रतिनिधी) : जळगांव शहर महानगरपालिका निवडणुक २०२६ करीता जळगांव शहर मध्ये १९ प्रभाग मध्ये एकूण ७५ नगरसेवक पदाकरीता एकूण १६९ मतदान केंद्रावर ५१६ बुथ असे नियोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जळगांव जिल्हा पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था आबाधित व निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी शस्त्र परवाना धारक इसमांकडून एकूण २५१ शस्त्र जप्त करण्यात आलेली आहे.

तसेच जळगांव शहरातुन उपद्रवी असलेले तसेच गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले ९८ ईसम यांना निवडणुक कालावधीत हद्दपार करण्याचे प्रस्तावित असुन ७८ ईसमांविरुध्दचा हद्दपार प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक, जळगांव यांचेकडे सादर करण्यात आला आहे. तसेच काही उपद्रवी ईसम यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४९ अन्वये १५० इसमांना नोटीस देण्याचे प्रस्तावित असुन ६१ लोकांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत.

असा आहे बंदोबस्त
तसेच नमुद निवडणुकीचे अनुषंगाने ०९ पोलीस उपअधीक्षक, २१ पोलीस निरीक्षक, ६० सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, १०७० पुरुष पोलीस अंमलदार, १३७ महिला पोलीस अंमलदार, ०८ दंगा नियंत्रण पथके, ०२ शिघ्र प्रतिसाद दल, ०१ एसआरपीएफ कंपनी, ११०० होमगार्डस असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button