अभिवादनजळगावताज्या बातम्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव शहर भाजप कार्यालयात होणार ध्वजारोहण

कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक २६ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरतर्फे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) आणि भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

ध्वजारोहणाचा पहिला कार्यक्रम सकाळी ८ वाजता ‘जी.एम. फौंडेशन’ येथे होईल. त्यानंतर सकाळी ८:१५ वाजता बळीराम पेठ येथील ‘वसंत स्मृती’ कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास भाजप जळगाव जिल्हा महानगरचे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, विविध मोर्चा, आघाडी व प्रकोष्ठांचे पदाधिकारी, नवनिर्वाचित नगरसेवक, मंडल अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख आणि सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, भारतीताई सोनवणे, राहुल वाघ, नितीन इंगळे आणि जयेश भावसार यांनी केले आहे, असे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button