ताज्या बातम्याजळगावशालेयशैक्षणिक

पीएम श्री केंद्रीय विद्यालयात “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा!

जळगाव (प्रतिनिधी) : येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधील पीएम श्री केंद्रीय विद्यालयात शुक्रवारी जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमाच्या अंतर्गत नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती म्हणजे पराक्रम दिन या निमित्ताने तसेच ऑपरेशन सिंदूर या थीमवर संबंधित प्रश्नमंजुषा स्पर्धा केंद्रशासनाच्या मार्फत घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील सीबीएससी पॅटर्न असलेल्या शाळांचा सहभाग होता.

या स्पर्धेत विद्यार्थी व त्यांच्यासोबत आलेले सर्व शिक्षक यांना योग्य तो सन्मान तसेच चहा नाश्ता, जेवण व प्रमाणपत्र केंद्रीय विद्यालयामार्फत देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य सोना कुमार होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी परीक्षा पे चर्चा पराक्रम दिवस आणि ऑपरेशन सिंदूर बद्दल विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे कॉर्डिनेटर नितीन आरसे होते. तसेच कार्यक्रमाचे संचालन गणेश वाघमारे आणि प्रीती सोज्वळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button