आर्थिकक्राईमजळगावताज्या बातम्याशासकीय

अवैध गांजाची साठवणूक करणारा पोलिसांच्या जाळ्यात !

२० हजारांचा ३ किलो गांजा जप्त; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : तांबापुरा भागातील मच्छीमार्केट परिसरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवणूक करणाऱ्या एका संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी तांबापूरातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १९ हजार ३२० रुपये किमतीचा ३ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त केला असून संशयित आरोपीवर एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तांबापुरा परिसरात एक इसम गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तांबापुरा परिसरात धाड टाकली. पोलिसांनी शासकीय वाहन लांब उभे करून पायी चालत संशयित घराची पाहणी केली असता, एक तरुण हातात गोणी घेऊन बसलेला आढळला.

पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव शेख अशपाक शेख मेहमुद (वय २३, रा. मच्छीबाजार, तांबापुरा) असे सांगितले. त्याच्याकडील गोणीची तपासणी केली असता, त्यात गांजा असल्याचे त्याने कबूल केले. त्याच्याकडून किलो २२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि चेतन पाटील करत आहेत.

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सपोनि गणेश वाघ, चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील व एमआयडीसी पोलीस पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button