जळगावअभिवादनऐतिहासिकताज्या बातम्यानिवडपुरस्कारमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशैक्षणिक

अंशिका महाजन हिने वयाच्या पावणे ४ वर्षातच केला विश्वविक्रम…!

इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

जळगाव (प्रतिनिधी) : येथील एमटीएस परीक्षेचे संचालक सुभाष महाजन यांची नात अंशिका नचिकेत महाजन हिने “ब्री आणि चिवचिव चिमणी” ची गोष्ट तयार करून अवघ्या ३ वर्ष ७ महिन्याच्या वयातच जागतिक विक्रम केला आहे. तिला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड कडून नुकतेच सर्टिफिकेट व सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे.

जन्मापासूनच विविध गोष्टी ऐकण्याच्या सवयीमुळे अंशिकाला बोलता येऊ लागल्यापासून ती हॉलमध्ये फिरता फिरता एकेक वाक्य स्वतःच बोलू लागली. जेवताना, झोपतांना ती आजी, आजोबा, आई, वडिलांकडून गोष्ट ऐकल्याशिवाय झोपत नसे. तिला लहानपणापासून डायनासोरच्या गोष्टी, चित्रे, मॉडेल्स खूप आवडत. ती स्वतः डायनासेर बद्दल घरातल्यांना माहिती सांगू लागली व विचारू लागली. एके दिवशी ती अशीच बडबड करत असलेली तिच्या आईच्या लक्षात आले. आईने तिला ती काय बोलते विचारल्यावर अंशिका म्हणाली मी तुला डायनासोरची गोष्ट सांगते. असे म्हणून तिने तिच्या कल्पनेप्रमाणे रंगवलेली डायनासोरची गोष्ट ऐकवली. असे दोन तीन वेळा झाल्याने तिची गोष्ट रंगाात येऊ लागली. गोष्ट ऐकताना तिच्या आईने मोबाईलमध्ये ती रेकॉर्ड केली. ही रेकॉर्डिंग झालेली गोष्ट लिहून काढली.

ती गोष्ट प्रकाशित करायचे ठरविले. गोष्टीला अनुसरून तिच्या वडिलांनी व आईने ए.आय.च्या मदतीने चित्रे जमा केली. ए आय च्याच मदतीने मुखपृष्ठही तयार झाले आणि २ मे २०२५ रोजी आनंद पब्लिकेशन्सचे संचालक जितू कोठारी यांनी छपाई करू दिले. तिच्या आई वडिलांनी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डकडे नोंदणी केली. तसेच सर्टिफिकेट व सन्मानचिन्ह इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड कडून नुकतेच प्राप्त झाले आहे. आता रामायण महाभारतातल्या गोष्टीही ती आम्हा सांगत राहते. पुण्याच्या डॉट्स टू लेटर्स या शाळेत तिने आता बालगटात प्रवेश घेतलाआहे. या विश्व विक्रमामुळे तिचे दाललेखिका म्हणून सर्वत्र कौतुक केले जात आहे. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनीही तिचे खास कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button