जळगावताज्या बातम्यानिवडणूकराजकारण

जळगाव मनपा निवडणूक ; दिवसभरात एकूण २४ अर्ज दाखल!

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव मनपा निवडणूक काही दिवसांवर आल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग मिळाला आहे. यातच मनपात आज शनिवार रोजी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटासह अशा अन्य २४ इच्छुक उमेदवारांनी आपला उमेवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच दिवसभरात २३५ इच्छुक उमेदवारांनी अर्जांची खरेदी केली आहे.

आज दाखल झालेल्या २४ अर्जांचा विचार करता विविध प्रभागांमधून इच्छुक उमेदवारांचा वाढता प्रतिसाद महापालिका निवडणुकीतील चुरस अधिक तीव्र होत असल्याचे संकेत देत आहे. तर राजकीय पक्षांचीदेखील हालचाल वाढली असून भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मधून उज्ज्वला बेंडाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तर प्रभाग क्रमांक १३ मधून शिंदे गटाकडून ज्योती चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे आकार घेऊ लागली आहेत. आगामी दिवसांत आणखी उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता असून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मोठी गर्दी अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button