आरोग्यजळगावताज्या बातम्यानिवडणूकराजकारण
जळगाव मनपा निवडणूक; निवडणुकीच्या पूर्वीच महायुतीच्या १२ जागा बिनविरोध!

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू होण्याआधीच महायुतीने जोरदार सुरूवात केली असून भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येकी ६ असे एकूण १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे आता उर्वरित 63 जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे निश्चीत झाले आहे.
असे आहेत निवडून आलेले उमेदवार
- प्रभाग क्रमांक- 12 ब मधून भाजपच्या उज्वला बेंडाळे यांच्या विरोधातील अर्ज बाद झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
- प्रभाग क्रमांक-18 मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
- प्रभाग क्रमांक-८ मधून शिवसेनेचेच मनोज सुरेश चौधरी आणि प्रतिभा गजानन देशमुख हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
- प्रभाग क्रमांक-२ मधून आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सकाळीच सागर शाम सोनवणे हे शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध झाले.
- प्रभाग क्रमांक 7-अ मधून यानंतर भाजपचे उमेदवार तथा आ. राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे हे विरोधी उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडून आले.
- प्रभाग क्रमांक 7 भाजपच्या उमेदवार दीपमाला काळे यांची देखील बिनविरोध निवडून आले.
- प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपचे डॉ. विरन खडके यांच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे.
- प्रभाक क्रमांक 13 मधून वैशाली अमित पाटील यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची देखील बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे.
- प्रभाग क्रमांक 7-ब मधून अंकिता पंकज पाटील यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.
- प्रभाग क्रमांक 19-अ मधून शिवसेनेचे विक्रम उर्फ गणेश सोनवणे यांच्या विरोधातील उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे त्यांची देखील बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे.




