जळगावताज्या बातम्यानिवडनिवडणूकमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीय-राज्यशासकीयशेतकरी

जळगाव जिल्ह्यात दुपारपर्यंत मतदानाचा उच्चांक !

जिल्ह्यात यावल येथे सर्वाधिक मतदान; भडगावला अल्प प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदारांचा दुपारपर्यंत मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळपासूनच नागरिकांनी मतदान केंद्रांवर गर्दी होती, तर दुपारपर्यंत या उत्साहात आणखी वाढ झाली असून दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ४४.९७ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात यावल येथे सर्वाधिक मतदान झाले असून भडगावला नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारी दिसून येत आहे.

जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी पालिकांमधील सदस्यपदाच्या ४५२ जागांसाठी १५१४ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात ‘लॉक होणार आहे. ६ पालिकांमधील १२ प्रभागांसाठी मंगळवारी मतदान होणार नसल्याने केवळ ४५२ जागांसाठीच ही प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे १२ प्रभागातील ४१ उमेदवार वळता १५१४ उमेद‌वारांच्या नावांचा मतपत्रिकेतर समावेश असणार आहे.

१८ पालिकांच्या सदस्यांसह अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली असून गतदान केंद्रे सज्ज आहेत.

जिल्ह्यात कुठे किती टक्के मतदान?
जामनेर ४३.३२, भुसावळ ४०.४१, यावल ५६.२५, फैजपूर ५५.१२, पाचोरा ४०.३१, वरणगाव ४९.६०, अमळनेर ४४.५१, चाळीसगाव ४३.९४, सावदा ४३.४८, चोपडा ४५.१२, भडगाव ३३.३७, रावेर ५०.९४, धरणगाव ५१.५२, एरंडोल ५६.५१, पारोळा ४८.४९, नशिराबाद ४५.६५, मुक्ताईनगर ४१.४८, शेंदुर्णी ५१.५२.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button