आरोग्यजळगावताज्या बातम्यानिवडसामाजिक

रोटरी इंटरनॅशनल असेंबलीसाठी डॉ.राजेश पाटील अमेरिकेला रवाना

जळगाव (प्रतिनिधी) : अमेरिकेत ११ ते १६ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या रोटरी इंटरनॅशनल असेंबलीसाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे गव्हर्नर इलेक्ट व जळगाव येथील बालरोग तज्ञ डॉ. राजेश पाटील व डॉ. सीमा पाटील हे रवाना झाले आहेत. जगभरातील २२० देशांमधील ५२३ रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर या असेंबलीमध्ये सहभागी होणार आहेत. भारतातून ४२ रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर त्यात सहभागी होत असून डॉ.राजेश पाटील यांचा यात समावेश आहे.

रोटरीमध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पदाची निवडणूक तीन वर्ष आधी होत असते. नासिक ते गोंदिया अशा १३ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे २०२६ – २७ मध्ये गव्हर्नर म्हणून डॉ. राजेश पाटील हे ११६ रोटरी क्लब मधील हजारो रोटरी सदस्यांचे नेतृत्व करणार आहेत. गव्हर्नर होण्याचा हा बहुमान जळगावला तब्बल १८ वर्षानंतर मिळाला आहे.

या इंटरनॅशनल असेंबली मध्ये जगभरातील रोटरी लीडर्ससमवेत डॉ. राजेश पाटील यांना विचारांचे आदान-प्रदान व सुसंवादाची संधी मिळणार आहे. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात विविध रोटरी क्लबच्या अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button