
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन कडून मान्यता प्राप्त राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा रत्नागिरी येथे नुकत्याच झाल्यात. त्यात चाळीसगाव येथील कुमारी ओवी अमोल पाटील ही १३ वर्षा आतील मुली दुहेरी स्पर्धेत उपविजेती ठरली. तसेच मागच्या महिन्यात चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतसुद्धा ती १३ वर्षातील मुली दुहेरी स्पर्धेत विजेती राहिली होती.
जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन इरिगेशन सिस्टीम लि. कडून तिचा पुष्पगुच्छ आणि बॅडमिंटनची कीटबॅग देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी तिचे प्रशिक्षक व वडील अमोल पाटील, जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, प्रशिक्षक किशोर सिंह उपस्थित होते.




