आर्थिकक्राईमजळगावताज्या बातम्याशासकीयसमस्या

सावधान : बनावट वेबसाइट, ॲप्स आणि लिंकपासून सावध रहा!

प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी तसेच ई-चलनाशी संबंधित विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध असल्याचा फायदा घेत काही फसवणूक करणारे बनावट वेबसाइट्स, बनावट मोबाईल ॲप्स (APKs), आणि संशयास्पद लिंकद्वारे नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वाढत्या प्रकारावर लक्ष वेधत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 “आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी” आणि अनधिकृत पेमेंट लिंक पाठवणे. वाहन चालविण्याचा परवाना (“DL”) सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासणी करा” असे संदेश पाठवणे. “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” अशा नावाच्या अनधिकृत APK ॲप्स/फाईल्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त करणे. अशा प्रकारे फसवणूक करणारे संदेश पाठवून नागरिकांना जाळ्यात ओढतात

प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी सांगितले की, “अनधिकृत लिंक आणि फर्जी APK अॅप्सद्वारे OTP, बँक माहिती व मोबाईलमधील संवेदनशील डेटा चोरीला जात आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये.” विभागाने स्पष्ट केले आहे की RTO कार्यालय अथवा परिवहन विभाग कधीही WhatsApp किंवा SMS द्वारे पेमेंट लिंक पाठवत नाही.

 नागरिकांनी केवळ gov.in ने समाप्त होणाऱ्या खालील अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन विभागाने केले आहे. ज्यात वाहन नोंदणी (VAHAN) : vahan.parivahan.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) : sarathi.parivahan.gov.in,  परिवहन सेवा : parivahan.gov.in, ई-चलन पोर्टल : echallan.parivahan.gov.in याशिवाय com, online, site, in अशा डोमेनवरील कोणतेही संकेतस्थळ उघडू नये, असेही सूचित करण्यात आले आहे.

संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास National Cyber Crime Portal ( https://www.cybercrime.gov.in ), सायबर फसवणूक हेल्पलाईन 1930 किंवा जवळच्या जिल्हा सायबर पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button