
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब जळगावने सुरु केलेल्या रोटरी वाचन कट्ट्यामुळे शहरात वाचन संस्कृती रुजतेय. गेल्या तीन वाचन कट्ट्यात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्यासह ज्येष्ठ सदस्य आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
आवडीच्या पुस्तकातील वाचन या विषयावरील कट्ट्यामध्ये रोटरी क्लब जळगावचे माजी अध्यक्ष प्रेम कोगटा, अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, संवाद सचिव पंकज व्यवहारे, संदीप शर्मा, कॅप्टन मोहन कुलकर्णी, जितेंद्र ढाके, मनोज जोशी, प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, आदिती कुलकर्णी, नितीन काळुंखे, राकेश चव्हाण, रवींद्र स्वामी यांनी सहभाग घेतला.
बालदिनानिमित्त व. वा. जिल्हा वाचनालयात झालेल्या रोटरी वाचन कट्ट्यात मधुरा अमळनेरकर, दुर्वा चौधरी, नेहल झोपे, अनघा व्यवहारे, कौस्तुभ सहजे, पुर्वा काळुंखे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी व. वा. वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह, प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे, रोटरीचे मानद सचिव सुभाष अमळनेरकर, चैत्राली चौधरी, स्वाती ढाके, योगेश चौधरी, निलेश झोपे, वृषाली व्यवहारे, ग्रंथपाल अनिल अत्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रवास वर्णन या विषयावर झालेल्या रोटरी वाचन कट्ट्या मध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, जेष्ठ बालरोग तज्ञ डॉ. नंदिनी आठवले, व.वा. वाचनालयाच्या संगीता अट्रावलकर, लीना लेले यांच्यासह रोटरीचे नित्यानंद पाटील, सी.ए. रवींद्र पाटील, ॲड. हेमंत भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.




