जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या कृष्णल सावकारेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

रावेर (प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर येथील इयत्ता चौथीतील विद्यार्थी कृष्णल अरुण सावकारे याने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कृष्णलने ३०० पैकी १७६ गुण मिळवत ही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली असून, रावेर शहरातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच त्याने जळगाव जिल्ह्यात २४६ वा क्रमांक मिळविला आहे.

कृष्णलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रविंद्र पवार सर, सचिव सौ. मनिषा पवार मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. हिरकणी धांडे मॅडम तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. राजू पवार सर यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कृष्णलच्या या यशामुळे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button