स्वामी प्रि-प्रायमरी अँड समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

रावेर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिन देशभक्तीच्या वातावरणात स्वामी प्रि-प्रायमरी अँड समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूल, केऱ्हाळा बु. येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या व स्वामी विवेकानंद, सरस्वती मातेचे पूजन करून झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवानंद महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून समृद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील हे उपस्थित होते. ध्वजसंचलन मंगेश महाजन यांनी केले. तर रमेश पाटील यांनी उपस्थितांनी राष्ट्रगीत, झेंडा गीत, महाराष्ट्र गीत गायन करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच सर्व सन्मानित अतिथींचे सत्कार करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, नृत्य, भाषणे सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. विविध भाषांमध्ये देण्यात आलेल्या भाषणांतुन विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, राष्ट्रप्रेम आणि नवे भारत घडवण्याचा संदेश दिला. तसेच स्वामी एज्युकेशनल गृपचे अध्यक्ष रविंद्र पवार व सचिव मनिषाताई पवार यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख जॉन्सी थॉमस यांनी केले. सूत्रसंचालन आकांक्षा महल्ले, वैशाली पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन भारती महाजन यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.




