
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंबोल येथील रहिवासी तथा चाळीसगाव येथे महामार्ग पोलीस खात्यात कार्यरत असलेले प्रभारी अधिकारी अमोल कवळे यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सेवा समर्पण संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. श्री कवळे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न झालेली कारवाई करत ६५ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करून अतुलनीय सेवा बजावली आहे.
यावेळी जितेंद्र पाटील, विजय पाटील, योगेश पाटील, डॉ. संदीप पाटील, निंबोलचे पोलीस पाटील योगेश पाटील, सचिन पाटील, निलेश पाटील आदी ग्रामस्त उपस्थित होते.