
विजेत्यांना अंतिम स्पर्धेसाठी संधी
जळगाव (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे रोटरी क्लब नागपूर व्हिजन आयोजित राज्यस्तरीय रोटरी सुपरस्टार संगीत स्पर्धेच्या ऑडिशन फेरीचे आयोजन करण्यात आले. मायादेवी नगर येथील रोटरी भवन मध्ये आयोजित या निवड चाचणी स्पर्धेत एकूण ३६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून सादरीकरण केले. परीक्षक म्हणून किरण सोहळे आणि विशाखा देशमुख यांनी काम पाहिले.
मोठ्या गटात किरण कासार आणि कीर्ती पाटील हे विजेते तर उपविजेते नितीन चौधरी आणि प्राजक्ता केदार ठरले.
लहान गटात गटात गायनात आरव कोगटा आणि कृतिका बाविस्कर यांनी तर वाद्यवृंदात आदितेय पांडे आणि रिद्धीमा चौधरी यांनी विजेतेपद प्राप्त केले. उपविजेता आरव कोगटा
ठरला.
उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब जळगाव वेस्टचे अध्यक्ष गौरव सफळे, सचिव देवेश कोठारी, प्रकल्प प्रमुख डॉ. विजय शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सरीता खाचणे यांनी तर आभार डॉ. सुशीलकुमार राणे यांनी मानले. स्पर्धेनंतर परीक्षकांनी सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
यावेळी किरण सोहळे यांनी अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांसाठी एक दिवसाच्या विशेष प्रशिक्षण शिबिराची घोषणा केली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्पर्धेपूर्वी सर्व सहभागी स्पर्धकांना प्रकल्प प्रमुख डॉ. विजय शास्त्री यांनी मार्गदर्शन केले.




