
लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य यांची विशेष उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) : येथील गोदावरी फॉउंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये शिस्त राहावी म्हणून विद्यार्थी परिषदचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य, कमांडिंग ऑफिसर – १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य, हे इन्फंट्री – पंजाब रेजिमेंटचे अधिकारी असून, त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथून २००० मध्ये सैन्यात प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या सेवेत ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन मेघदूत तसेच जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थि परिषदेला आत्मविश्वास मिळाला.
कार्यक्रमात सर्व हेड बॉय आणि हेड गर्ल यांना बॅचेस प्रदान करण्यात आले. शाळेचे अनुशासन टिकवण्यासाठी परिषद गठीत करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजन स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समारोप आभारप्रदर्शन व देशभक्तीपर घोषणांनी झाला.