जळगावसामाजिक

आगामी कार्यकाळात शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रात काम करण्याचा संकल्प

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

जळगाव (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टचा पदग्रहण सोहळा रविवारी दि. २७ रोजी रोटरी हॉल, गणपतीनगर येथे उत्साहात पार पडला. कल्पेश छेडा यांनी २९ वे अध्यक्षपदी, तर पूजा अजय अग्रवाल यांची सचिवपदी तसेच नूतन कार्यकारिणीने पदग्रहण केले. त्यांच्या निवडीमुळे क्लबच्या सामाजिक उपक्रमांना नवीन दिशा मिळेल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे. आगामी कार्यकाळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासह शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रात आम्ही अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प नूतन पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल श्रीकांत इंदाणी, सहायक प्रांतपाल अपर्णा भट उपस्थित होते. सहायक प्रांतपाल यांनी प्रांतपाल यांचा संदेश वाचून सांगितला. मुख्य अतिथींचा परिचय संजय गांधी यांनी करून दिला. डॉ. जगमोहन छाबडा यांनी वर्षभराच्या कामाचा आढावा मांडला. यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. नवीन अनुभव मिळवून, ज्ञान मिळवून आणि तुमच्या कौशल्यांचा विस्तार करून सतत शिकणे महत्वाचे आहे. वैयक्तिक विकासासाठी सदस्यांनी वचनबद्ध रहा. पुस्तके वाचणे, सेमिनारमध्ये जाणे किंवा नवीन छंद जोपासणे यासारख्या बौद्धिकदृष्ट्या आव्हानात्मक कृतिकार्यक्रमांध्ये सहभागी होत राहा, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

प्रमुख अतिथींच्या हस्ते नवीन कार्यकारिणीचे पदग्रहण करण्यात आले. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष कल्पेश छेडा म्हणाले, “रोटरीच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रात आम्ही अधिक प्रभावीपणे काम करू.” त्यांनी येत्या काळात रोटरी ईस्टच्या विविध सामाजिक प्रकल्पांना गती देण्यासाठी विशेष योजना आखण्याचे संकेत दिले.

रोटरी ३०३० चे प्रांतपाल नाना शेवाळे आणि असिस्टंट गव्हर्नर अपर्णा भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवीन कार्यकारिणी कार्यरत राहील. या कार्यकारिणीमध्ये संजय गांधी, प्रमोद संचेती, वर्धमान भंडारी, डॉ. मनोज चौधरी, प्रदीप देशमुख, मितेश शाह, सुनील शाह, प्रदीप कोठारी, संजय शाह, अभय कांकरिया, विनोद पाटील, पीयूष सांघवी, पूर्वेश शाह, डॉ. राहुल भंसाली, प्रीतम मुनोत, रजनीश लाहोटी, जिज्ञासा पाटील, डॉ. मयुरी पवार, प्रणव महेता, डॉ. जगमोहन छाबडा, विक्रम मुनोत, प्रीतिश चोरडिया, संग्रामसिंह सूर्यवंशी या प्रमुख सदस्यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button