
सत्कार समितीची स्थापना, अध्यक्षपदी अशोक जैन यांची निवड
जळगाव (प्रतिनिधी) : देशाचे ख्यातनाम विशेष सरकारी वकील, पद्मश्री सन्मानित आणि अलीकडेच राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेले ॲड. उज्ज्वल निकम यांचा जळगाव शहरात भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिकांची समावेश असलेली “नागरी सत्कार आयोजन समिती” स्थापन करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक व जळगाव जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनातील ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक जैन यांची सर्वानुमतीने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे नियोजनकार्य वेगात सुरू झाले असून, लवकरच सत्कार सोहळ्याची तारीख व ठिकाण जाहीर करण्यात येईल.
या समितीत यांचा सहभाग
या समितीमध्ये ॲड. सुशिल अत्रे, ॲड. नारायण लाठी, ॲड. सुरेंद्र काब्रा, ॲड. महेंद्र शहा, भरतदादा अमळकर, डॉ. राहुल महाजन, नंदकुमार बेंडाळे, भालचंद्र पाटील, ललितचंद्र चौधरी, हरीश मुंदडा, अनिश शहा, राहुल पवार, जितेंद्र लाठी, श्री गर्गे, रोहित निकम, डॉ. राजेश पाटील, शंभू पाटील, राजेश झाल्टे, संग्रामसिंह सूर्यवंशी, प्रकाश बालानी, नंदू अडवाणी, जगन्नाथ बाविस्कर, राजेंद्र नन्नवरे, अरविंद देशमुख, विजय ठाकरे, एजाज मलिक, करीम सालार, अशोक लाडवंजारी, राजेंद्र पाटील, दिलीप तिवारी, सुनील पाटील, राम पाटील (पवार), कल्पेश छेडा, अमित भाटीया, विरेंद्रसिंह पाटील, उज्वल चौधरी, प्रशांत नाईक, रितेश निकम, अमर देशमुख, विकास भदाणे, डॉ. प्रीती अग्रवाल, हर्षाली चौधरी यांचा सहभाग आहे.
या नागरी सत्कार हा केवळ एक औपचारिक सोहळा न राहता, उज्वल निकम यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा व जळगावच्या मातीतून घडलेल्या व्यक्तीच्या देशपातळीवरील योगदानाची जाणीव करून देणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम ठरेल, असा विश्वास समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी यावेळी व्यक्त केला.