
रेकॉर्ड ब्रेक रक्तदान करून घेण्याचा भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा संकल्प
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी वाढदिवसाच्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरातच्या वतीने प्रत्येक मंडलात २ ठिकाणी रक्तदान शिबिरे होणार असून याद्वारे रेकॉर्ड ब्रेक रक्तदान करून घेण्याचा संकल्प भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केला आहे.
शिबिराच्या नियोजनासाठी दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यालय GM फाउंडेशन येथे बैठक झाली. या बैठकीत जळगाव जिल्हा महानगराच्या ५ मडलातून प्रत्येकी २ ठिकाणी कमीत कमी १०० बाटल्या रक्तदान होईल. तरीही पूर्ण महानगरातून ५०० पेक्षा जास्त बाटल्या रक्ताचे संकलन करण्याचा संकल्प महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले आहे.
या प्रसंगी विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, दीपमाला काळे, अक्षय चौधरी, विनोद मराठे, अतुल बारी, महेश पाटील, मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, डॉ.मनोज टोके, पितांबर भावसार आदी उपस्थित होते.