
जळगाव (प्रतिनिधी) : इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी देशातील सर्वात मोठी परीक्षा असलेल्या JEE Main 2025 च्या निकाल यादीनुसार सन्मित मनोज महाजन या विद्यार्थ्याचे AIR 3175 (ALL INDIA RANK) मध्ये निवड झाली असून OBC RANK 592 मिळाली आहे. या विद्यार्थ्याला JEE MAINS – 99.82 PERCENTILE संपादन केले. तसेच गेल्या वर्षी या विद्यार्थ्याने मॅक्रो व्हिजन अकॅडमी रावेर येथे इयत्ता 12 वी या वर्गात 95.2% विक्रमी यश संपादन केले होते.
सन्मित महाजन हा डॉ.मनोज महाजन (मेटरनिटी हॉस्पिटल मुक्ताईनगर) यांचा सुपुत्र आहे. शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी सन्मितचे अभिनंदन केले आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ऍड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर धनराज चौधरी, व्यवस्थापक किरण दुबे, शाळेचे मुख्याध्यापक जे .डी. यांनीही सन्मितचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.