
रावेर, (प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे गुरुपौर्णिमेचा सोहळा मोठा उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते गुरुपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पवार हे होते. तर प्रमुख पाहुणे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय रावेर येथील लतादीदी यांनी भूषवले.
याप्रसंगी इयत्ता दुसरी व तिसरीचे विद्यार्थी वाल्मीक ऋषी, महर्षी व्यास, ऋषी समर्थ रामदास, विश्वामित्र, सांधिपनी ऋषी आदींनी गुरुवर्यांचा वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकार केला. याप्रसंगी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त नृत्य सादर केले. तसेच पाचवीतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नूतन धनगर यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.