जळगावशैक्षणिक

ऐनपूर प्राथमिक विद्यामंदिरात चित्रकला स्पर्धा उत्साहात

ऐनपूर, ता.रावेर (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव यांचे मार्फत कृषिदूतानी शाळेत आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यात शाळेतील एकूण १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

प्रथम गट – इयत्ता पहिली व दुसरी व द्वितीय गट तिसरी व चौथी या गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी गोडी निर्माण व्हावी त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव व चालना मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात वृक्षरोपण करतांना विद्यार्थी गट क्रमांक एक इयत्ता इयत्ता पहिली व दुसरी व शेतकरी शेत नांगरतांना गट क्रमांक दोन इयत्ता तिसरी व चौथी अशी चित्रे विद्यार्थ्यांना गटाप्रणाणे देण्यात आली.

विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव
स्पर्धेचे निरीक्षक म्हणून निकिता चौधरी, कल्याणी शिंदे, जयश्री सराफ, ममता पाटील यांनी काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरव महालकर, सौरव महेर, पियुष नेहते, पुष्पराज शेळके, कुणाल सपकाळे यांनी बक्षीसे दिली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अक्षय पाटील व सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button