बेंडाळे महाविद्यालयात मनीष लढे यांचे ‘यशाच्या दिशेने प्रवास’ विषयावर व्याख्यान

जळगाव (प्रतिनिधी) : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात उद्योजकता समिती तर्फे ‘यशाच्या दिशेने प्रवास’ या विषयावर ‘सुपर इट्स’चे निर्माते मनीष लढे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विनोद नन्नवरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख मनीष लढे यांनी आपल्या स्टार्ट-अप संबंधीचे विचार मांडत असताना वेगवेगळ्या व्यवसायातील अनुभव सांगितला. जीवनातील संघर्ष, अडथळे आणि आव्हाने स्वीकारून ज्यांनी कष्टाने प्रगती साधली, त्यांची उदाहरणे आपल्याला पुढे जाण्यास प्रवृत्त करतात. म्हणूनच, प्रत्येकाने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, सातत्याने प्रयत्न करून आणि समाजासाठी उपयुक्त कार्य करून यशाकडे वाटचाल केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय विचार मांडतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील यांनी व्यवसाय करत असताना अपयश बऱ्याच वेळा येऊ शकते पण आपण खचून न जाता यशाच्या दिशेने वाटचाल करत राहणे. व्यवसायातील खरे यश म्हणजे केवळ आर्थिक नफा नव्हे तर ग्राहकांचा विश्वास, कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि समाजात सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सत्यजीत साळवे, डॉ. पी. एन. तायडे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सचिन कुंभार यांनी केले तर आभार प्रा. मंगेश किनगे यांनी मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




