क्रीडाजळगाव

ऑगस्टमध्ये जळगावात होणार पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा

कान्ताई सभागृहात १ ते ३ ऑगस्टदरम्यान आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : स्व. ॲड. सीताराम (बबन भाऊ) बाहेती यांच्या जयंतीनिमित्त, जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने आणि जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहकार्याने जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ ते ३ ऑगस्टदरम्यान कान्ताई सभागृह (जुना नटराज थिएटर), जळगाव येथे होणार आहे.

या स्पर्धेसाठी एकूण १५ हजाराची रोख पारितोषिके ठेवण्यात आलेली असून, ती ॲड. रोहन बाहेती यांच्या सौजन्याने दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी स्पर्धेचे प्रमुख संयोजक मंजूर खान (९९७०६४७८६८) व तांत्रिक प्रमुख सय्यद मोहसिन (७०२०६७३३५७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून कय्यूम खान व शेखर नरवरिया कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व कॅरमपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा व आपल्या कौशल्याची चमक दाखवावी, असे आवाहनही आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button