जळगावशैक्षणिकसामाजिक

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात साक्षरता जनजागृती

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (युनिट) च्या वतीने जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात आला. सर्वांसाठी साक्षरता: सशक्ततेकडे वाटचाल या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात रासेयो कार्यक्रम अधिकारी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यावेळी त्यांनी साक्षरतेचे समाजात व व्यक्तीच्या प्रगतीतील महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर विविध उपक्रम पार पडले. रासेयो स्वयंसेवकांनी परिसरातील अशिक्षित महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राथमिक साक्षरता वर्ग घेतले, ज्यामध्ये वाचन, लेखन आणि मूलभूत गणित शिकवले गेले. स्वयंसेवकांनी रंगीत चार्ट, आकृत्या आणि संवादात्मक पद्धतींचा वापर करून शिकवण अधिक परिणामकारक केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर, बॅनर आणि माहितीपत्रके प्रदर्शनाद्वारे साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट केले.

७० हून अधिक रासेयो स्वयंसेवकांचा सहभाग
आजीवन शिक्षणाचा मार्ग आणि साक्षरतेनेच सशक्तीकरण यांसारखे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले. यानंतर वाचन वर्तुळ हा उपक्रम राबवण्यात आला, जिथे स्वयंसेवकांनी नैतिक कथा व प्रेरणादायी लेख वाचून दाखवले. यामुळे वाचनाची आवड निर्माण होऊन संवादाची नवी दिशा मिळाली. कार्यक्रमात शिक्षकांनी महिलांसाठी शिक्षणाचे महत्त्व, साक्षरतेने मिळणारे आत्मसन्मान आणि सक्षमतेची जाणीव यावर मार्मिक व प्रेरणादायी विचार मांडले. या सत्रामुळे उपस्थित समुदाय सदस्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारली. या उपक्रमात ७० हून अधिक रासेयो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button