एक गाव एक गणपती व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तर्फे आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव (प्रतिनिधी) : गणेश उत्सवा निमित्त एक गाव एक गणपती व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तर्फे मुख्यमंत्री सहायता कक्षा मार्फत पूर्ण महाराष्ट्रभर चालवलेल्या श्री गणेशा आरोग्याचा अंतर्गतआरोग्य तपासणी शिबिर गुरुवारी, ४ रोजी साईबाबा मंदिराच्या पटांगणात सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिराच्या माध्यमातून रक्तदाब, वजन, शुगर, एचबी, सीबीसी, डब्ल्यू बीसी थायरॉईड, ईसीजी, तपासण्या करण्यात येणार आल्या. तपासणी करून मोफत सल्ला व मार्गदर्शन डॉ. आगतराव औघडे अधिष्ठाता, डॉ.सीमा गिरी डॉ.शर्मिली सूर्यवंशी डॉ.अनिल वाघ व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय जळगाव टीम करण्यात आले.
१५० नागरिकांनी घेतला लाभ
शिबिराचा १५० नागरिकांनी लाभ घेतला, कार्यक्रमालाएक गाव एक गणपतीचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक प्रशांत नाईक, राहुल सानप ,योगेश नाईक, ऋषभ लाडवंजारी, भावेश पालवे, महेश लाड, आकाश वाघ, तेजस वाघ, गौरव घुगे ,सिद्धार्थ घुगे, तेजस घुगे, दीपक नाईक, सागर लाड, महेश घुगे, देवेंद्र वंजारी, सागर फोटोशूट,वैभव वाघ ,किरण नाईक उपस्थित होते.




