
लायन्स क्लबने घेतले दोन होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक
नंदुरबार, (प्रतिनिधी) : येथील अभिनव विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमात लायन्स क्लबच्यावतीने मोफत वह्याचे वाटप केले आणि होतकरू दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचे घोषित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तारकेश्वर पटेल होते. याप्रसंगी लायन्स फेमिनाचा जिल्हा जीएसटी समन्वयक सुप्रिया कोतवाल, अध्यक्षा रंजना बोरसे, सचिव सारिका जमादार, खजिनदार सुरेखा वळवी, लायन्स फेमिना क्लब सदस्या रागिणी पाटील, जया जैन, आचल तोष्णीवाल, जेष्ठ शिक्षिका रत्ना चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात महर्षी व्यासाच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका विधी पाटील यांनी केले. कार्यक्रमात लायन्स फेमिनाचा वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दोन गटात वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. लहान गटातुन तहुरा शेख, चैतन्य मंडलिक, हार्दिक चौधरी तर मोठ्या गटातुन दक्ष चौधरी, कल्याणी गवळे, दृष्टी पाटील व अक्षरा राठी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
यावेळी सुप्रिया कोतवाल, रंजना बोरसे यांनी गुरुची महिमा गोष्टी रुपात विद्यार्थ्यांच्या समोर मांडली. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना लायन्स फेमिनाचा वतीने संन्मानित करण्यात आले. तसेच गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यांना लायन्सचा वतीने मोफत वह्याचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त होतकरू दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचे लायन्स फेमिनाचा वतीने घोषित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्राचार्य तारकेश्वर पटेल यांनी मनोगतातुन प्राचीन शिक्षण पध्दतीतील गुरु व आधुनिक शिक्षण पध्दतीतील एआय शिक्षक या विषयीची माहिती मांडली. कार्यक्रमाला सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन चेतना गोसावी यांनी केले. आभार काम तिलोत्तमा चौधरी यांनी मानले.