स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल येथे येलो कलर डे उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी ) स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर येथे येलो कलर डे अत्यंत रंगतदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण शाळा पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने उजळून निघाली होती.
कार्यक्रमाची सुरुवात नर्सरीतील चिमुकल्यांच्या स्मित हास्याने सुरु झाली. एलकेजी आणि यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य सादर करत सर्वांची मने जिंकली. फर्स्ट क्लासच्या विद्यार्थ्यांनी रंजनात्मक खेळ सादर केले, तर सेकंड क्लासच्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी उपस्थित भारावले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका डॉ. सुखदा पवार मॅडम, शाळेचे प्राचार्य डॉ. रातीश मौन सर, तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे यांची उपस्थिती लाभली.
हा कार्यक्रम इंग्लिश मीडियम विभागाच्या HOD अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा रायपुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंदाने परिश्रम घेतले.