‘पिंक वॉक’व्दारे जळगावात स्तनांच्या कर्करोगाबद्दल जनजागृती

जळगाव (प्रतिनिधी) : महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी सकाळी आकाशवाणी चौकापासून भाऊंच्या उद्यानापर्यंत पिंक वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव, आयएमए वुमन डॉक्टर्स विंग आणि जळगाव ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिनानिमित्त या पिंक वॉकचे आयोजन केल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे यांनी सांगितले.
महिलांमध्ये कर्करोगा विषयी वेळेवर तपासणी व लवकर निदान झाल्यास उपचारात अधिक यश मिळते असे डॉ. निलेश चांडक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. आयएमए जळगावचे सचिव डॉ. भरत बोरोले, वुमन्स विंगच्या सचिव डॉ. नीलम पाटील, जेओजीएसच्या अध्यक्ष डॉ. वैशाली चौधरी या मान्यवरांसह मान्यवरांसह अनेक डॉक्टर्स व नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. नीलम पाटील यांनी केले.




