जळगावताज्या बातम्यानिवडनिवडणूकमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीय-राज्यसामाजिक
जामनेर नगरपरिषद; नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलेसाठी पद राखीव

जामनेर (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये व सूचनेनुसार जामनेर नगरपालिका प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, नगरपालिका मुख्याधिकारी नितीन बागुल, उपमुख्य अधिकारी डांगे व नगरपालिका कर्मचारी तसेच नागरिका उपस्थित होते.
दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलेसाठी पद राखीव जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासह अनेक प्रभागांमध्ये महिलांसाठी आरक्षण असल्याने जामनेर नगरपालिकेमध्ये महिला सत्तेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.
प्रभागनिहाय आरक्षण असे
- प्रभाग क्रमांक १ – १ अ अनु.जाती, १ ब सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्रमांक २ – २ अ सर्वसाधारण, २ ब सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्रमांक ३ – ३ अ सर्वसाधारण, ३ ब ना.मा.प्र. महिला
- प्रभाग क्रमांक ४ – ४ अ सर्वसाधारण, ४ ब सर्वसाधारण
- प्रभाग क्रमांक ५ – ५ अ सर्वसाधारण, ५ ब सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्रमांक ६ – ६ अ सर्वसाधारण महिला, ६ ब सर्वसाधारण
- प्रभाग क्रमांक ७ – ७ अ ना.मा.प्र. महिला, ७ ब सर्वसाधारण
- प्रभाग क्रमांक ८ – ८ अ सर्वसाधारण, ८ ब ना.मा.प्र. महिला
- प्रभाग क्रमांक ९ – ९ अ सर्वसाधारण, ९ ब ना.मा.प्र. महिला
- प्रभाग क्रमांक १० – १० अ सर्वसाधारण, १० ब अनु.जाती महिला
- प्रभाग क्रमांक ११ – ११ अ ना.मा.प्र., ११ ब सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्रमांक १२ – १२ अ सर्वसाधारण, १२ ब सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्रमांक १३ – १३ अ सर्वसाधारण, १३ ब अनुसूचित जाती महिला




