जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत श्वान जंजिर सेवा निवृत्त

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेला श्वान जंजिरचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम आज पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, श्वान पथक प्रभारी अधिकारी पो. उपनि देविदास वाघ श्वान हस्तक, पोहेकॉ निलेश झोपे, पोना प्रशांत कंकरे, पोहेकॉ संदिप परदेसी आदी उपस्थित होते.
श्वान जंजीर याचा जन्म 18 नोव्हेंबर 2017 रोजी झालेला असून त्याचे 9 महिन्याचे प्रशिक्षण गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे झालेले आहे. श्वान जंजीर हा जळगांव जिल्हा पोलीस दलात 7 एप्रिल 2018 पासुन कार्यकत होता.
आरोपींचा शोध घेण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन
त्याने आज पावेतोच्या सेवेमध्ये चाळीसगांव पोस्टे, MIDC पोस्टे, भुसावळ शहर पोस्टे तसेच इतर पोस्टेचे गुन्ह्यात आरोपीतांचा योग्य मार्ग काढुन आरोपींचा शोध घेतलेला आहे. तसेच इतरही गुन्ह्यात आरोपींचा शोध घेणे कामी श्वान जंजिरने मोलाचे मार्गदर्शन केले आहे.




