अभिवादनआरोग्यऐतिहासिककलाकारजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यसामाजिक

संगीत रिसर्च अकादमीच्या महोत्सवाचे १ व २ नोव्हेंबर रोजी आयोजन

वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचा कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे देशभरातील अनेक प्रतिथयश संस्थान बरोबर समन्वय आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारत वर्षात सुपरिचित असलेली कोलकात्याची आयटीसी संगीत रिसर्च अकादमी यांच्यासोबत प्रतिष्ठानचे नुकतेच समन्वय झाले असून दोन दिवसांचे मिनी संगीत समेलनाचे आयोजन प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

हे संमेलन शनिवार व रविवार १ व २ नोव्हेंबर रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृहात संध्याकाळी ७ ते १० या वेळेत संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे उ‌द्घाटन व दीप प्रज्वलन जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, आयटीसीचे गुरु पं. ओंकार दादरकर यांच्या हस्ते दोन दिवसीय या संगीत संमेलनात दोन स्कॉलर विद्यार्थी व दोन प्रतिथ यश कलावंत सहभागी होणार आहे. प्रथम दिवशीच्या प्रथम सत्रात स्कॉलर कौस्तव रॉय याचे सरोद वादन होईल त्याला तबल्याची साथ रमेंद्र सिंग सोलंकी करतील. दुसरे सत्र अकादमीचे गुरु व प्रतिथयश गायक पं. ओंकार दादरकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना तबल्याची साथ युवा आश्वासक तबला वादक तेजोवृष जोशी तर संवादिनी साथ अनंत जोशी करतील. रविवार अर्थात दुसऱ्या दिवशी च्या कार्यक्रमाची सुरवात आपल्या जळगावच्या युवा कलाकार नुपुर चांदोरकर-खटावकर व आर्या शेंदुर्णीकर यांच्या छोटेखानी कथक व गुरुवंदनेने होईल.

त्यानंतरचे दुसरे सत्र स्कॉलर अनुभव खामारू यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने संपन्न होईल. त्यांना तबल्याची साथ तेजोवृष जोशी तर संवादिनीची साथ अनंत जोशी करतील. या संगीत संमेलनाचा समारोप होईल.पत्रकार परिषदेत दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे, शरदचंद्र छापेकर, दीपिका चांदोरकर, नुपूर खटावकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button