जामनेर पंचायत समिती: गणनिहाय आरक्षण सोडत जाहीर

जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर तालुका पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. हा कार्यक्रम जामनेर तहसील कार्यालयात १३ रोजी पार पडला. सोडत कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी, तहसीलदार आदी अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन तहसील कार्यालयातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी केले. आरक्षण सोडतीची प्रक्रिया दुपारी सुरू झाली. पारदर्शक पद्धतीने लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निर्वाचक गन निहाय आरक्षण असे
91- पळासखेडे प्र न – सर्वसाधारण महिला
92-नेरी दिगर – सर्वसाधारण (अनारक्षित)
93-खडकी – नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग
94-बेटावद बु – सर्वसाधारण (अनारक्षित)
95-देऊळगाव – अनुसूचित जमाती
96-शहापूर – अनुसूचित जाती महिला
97-वाकडी – सर्वसाधारण (अनारक्षित)
98-पाळधी – सर्वसाधारण (अनारक्षित)
99- मोरगाव – नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला
100- लिहे – सर्वसाधारण (अनारक्षित)
101- पहूर पेठ – नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला
102- वाकोद – सर्वसाधारण महिला
103-फत्तेपूर – सर्वसाधारण महिला
104-तोंडापूर – अनुसूचित जमाती महिला




