
२२ विद्यार्थ्यांना चष्म्याचे वाटप
जळगाव (प्रतिनिधी) : ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अपंग सेवा मंडळ संचालित मूकबधिर विद्यालय, जळगाव येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच २२ विद्यार्थ्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.
सुरुवातीला उर्मिला सोमानी यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अमित सोमानी यांच्याकडून विद्यार्थ्यांचे दंत तपासणी व डोळे तपासणी करण्यात आली. २२ विद्यार्थ्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमास उर्मिला सोमानी, अमित सोमानी, वैशाली सोमानी, अजय साठे, मुख्याध्यापक हेमंत मुंदडा, माजी मुख्याध्यापिका नीता सोमानी, शिक्षिका निशात शेख, दौलत पवार यांच्यासह शिक्षक तर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.




