बोदवड पंचायत समिती; ४ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

बोदवड (प्रतिनिधी) : बोदवड तालुक्यातील पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय, बोदवड येथे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. एकूण ४ जागांसाठी ही सोडत काढण्यात आली. अध्यक्षस्थानी जयश्री माळी (विशेष भूसंपादन अधिकारी, जळगाव) होत्या.
कार्यक्रमाचे संचालन बोदवडचे तहसीलदार अनिल वसंत पुरे यांनी केले. एकूण ४ जागांसाठी ही सोडत काढण्यात आली. लहान बालिका सांची सचिन पालवे हिच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण प्रक्रिया पार पडली.
आरक्षणानुसार ४१ नाडगाव आणि ४२ मनुर बु. या गटांसाठी अनारक्षित (सर्वसाधारण) वर्गात जागा आरक्षित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती (महिला) साठी ४३ साळशिंगी गट, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी ४४ शेलवड गट आरक्षित ठरला आहे. विशेष म्हणजे यावेळी अनुसूचित जमातीसाठी कोणतीही जागा आरक्षित झालेली नाही.




